आम्हाला पाठिंबा द्या
शेकडो तासांचे चित्रीकरण, मुलाखती, गाणी आणि संग्रहित साहित्य आधीच जमा केले आहे. आता आव्हान हा प्रकल्प सुरू करण्याचे नसून, या मोठ्या संग्रहाचे 6 पूर्ण चित्रपटांमध्ये रूपांतर करण्याचे आहे.
जात हा पहिला चित्रपट पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण माहितीपट मालिकेचा पाया मजबूत करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे.
आपण कोण आहोत
L’Atelier Bhimraya ही India Bhimraya प्रकल्पाला आधार देणारी ना-नफा संस्था आहे. भारतात २० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या संशोधन, चित्रीकरण, संग्रहित साहित्याचे संकलन आणि दीर्घकालीन नातेसंबंधांतून आकाराला आलेल्या या प्रकल्पाला मूर्त रूप देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
वर्षानुवर्षे एकत्र आलेली टीम
India Bhimraya या माहितीपटाची निर्मिती संशोधन, क्षेत्रीय अभ्यास, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण आणि एडिटिंग अशा विविध टप्प्यांतील दीर्घकालीन सहकार्यातून झाली आहे. काही सहकारी अनेक वर्षांपासून या प्रकल्पाशी जोडलेले आहेत, तर काही जण या संग्रहाचा विस्तार करून त्यातून 6 भागांची माहितीपट मालिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले.
जोएल काबालियों
मालिकेचे दिग्दर्शक व संशोधक · सचिव, ल’आतलिये भीमराया
मृना रीबाय
सह‑दिग्दर्शिका · अध्यक्षा, ल’आतलिये भीमराया
ज्युलिअँ जुगाँ
मानवशास्त्र · संगीत · ध्वनी
विनोद चहांदे
क्षेत्रकार्य सहकारी · मालिकेचा आवाज
सिमॉन बोर्झा आणि थिएरी रामादिये
संशोधन व वैज्ञानिक सहकार्य
फिलिप परेरा
मुख्य संकलक · संकलन समन्वय
नितीन सिंह चौहान
छायांकन · ड्रोन · डिझाइन
मयूर कुडुपले
संशोधन · मराठी–हिंदी भाषिक काम
विद्या धारप
मराठी–हिंदी भाषिक काम
नवाज शरीफ
नकाशांकन · अवकाशीय पुनर्रचना
सर्जनशील सहकार्य
चित्रपट/ माहितीपट पूर्णत्वाकडे जात असताना, नव्या सहकार्यांमुळे त्याच्या दृश्य मांडणीत आणि सार्वजनिक सादरीकरणातही नवे बदल आणि विस्तार होत आहेत.
सिद्धेश गौतम / बेकरी प्रसाद
दृश्य कलाचक्र · ग्राफिक ओळख
मिरांज
वेबसाइट संकल्पना · रचना · विकास
उत्तम कांबळे
*लेखक · जातमधील मुख्य चरित्रात्मक आणि कथनात्मक आवाज*
सामूहिक प्रयत्नातून रूपांतरीत झालेला एक प्रकल्प
India Bhimraya हा प्रकल्प अनेक वर्षे त्यावर काम करणाऱ्या लोकांच्या मेहनतीतून, त्यांनी जपलेल्या नात्यांतून आणि स्वतःच्या साधनसंपत्तीच्या मदतीने विकसित होत गेला. कालांतराने त्याचा विस्तार होऊन तो एक व्यापक सामूहिक उपक्रम बनला. यात चित्रपट, संशोधन, क्षेत्रीय काम, संगीत, संग्रहित साहित्य, भाषा, दृश्यनिर्मिती आणि नकाशांकन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.
या सर्जनशील आणि संशोधनपर उपक्रमाला एकत्र बांधणारी आणि दीर्घकाळ काम सुरू ठेवण्यास मदत करणारी व्यवस्था उभी करण्यासाठी L’Atelier Bhimraya या संस्थेची स्थापना करण्यात आली.
या संस्थेला पाठिंबा देणे म्हणजे प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला बळ देणे. यामुळे सहाही चित्रपट पूर्ण करता येतील, त्यांच्या निर्मितीत योगदान देणाऱ्यांना योग्य मानधन देता येईल, २० वर्षांहून अधिक काळात जमा केलेल्या संग्रहाचे जतन करता येईल आणि India Bhimraya अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल.


