संघटना
‘L’Atelier Bhimraya’ ही ‘India Bhimraya’ या प्रकल्पाचे संचालन करणारी एक ना-नफा (Non-profit) संस्था आहे. भारतातील वीस वर्षांहून अधिक काळाचे संशोधन, चित्रीकरण, आर्काइव्हल कार्य आणि वैयक्तिक संबंध यांतून आकाराला आलेल्या या उपक्रमाला एक शाश्वत आधार देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था सहाही चित्रपट पूर्ण करणे व त्यांच्या प्रसारासोबतच, यातील समृद्ध आर्काइव्ह जतन करणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. याशिवाय, या मालिकेच्या माध्यमातून आकार घेणाऱ्या कलात्मक, शैक्षणिक आणि भारत‑फ्रेंच सहकार्याला पाठबळ देणे हेही तिचे उद्दिष्ट आहे. या दीर्घकालीन प्रवासाला चित्रपटांचे व संग्रहांचे एक सर्वसुलभ व सामूहिक रूप देणे. तसेच आवश्यक भौतिक, संपादकीय आणि संस्थात्मक अधिष्ठान पुरवून मूळ संकल्पनेच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाचा निरंतर विस्तार करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

दृष्टी आणि ध्येय
‘L’Atelier Bhimraya’ ही संस्था मुख्य प्रवाहातील कथनांमध्ये अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या सामाजिक आणि राजकीय वास्तवांचे दस्तऐवजीकरण, जतन व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे. माहितीपट निर्माण, दीर्घकालीन फील्डवर्क, आर्काइव्हल रिसर्च, भाषांतर, सार्वजनिक प्रदर्शन आणि सहयोगात्मक सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था जात, विस्थापन, ग्रामीण बदल, सामाजिक चळवळी, विषमता आणि सामूहिक प्रतिकाराशी संबंधित दृश्ये, आवाज व इतिहास एकत्र आणत आहे.
दीर्घकालीन भारत‑फ्रान्स सहकार्यावर अधिष्ठित असलेली ही संस्था संशोधन, कलात्मक अभिव्यक्ती आणि सार्वजनिक संवाद यांमध्ये मिलाफ घडवून आणते. ‘India Bhimraya’ या प्रकल्पाच्या पलीकडे जाऊनही अभिलेख, परस्पर संवाद आणि चिकित्सक मांडणीसाठी एक शाश्वत मंच उभारणे, जे दक्षिण आशिया आणि फ्रान्सला प्रतिष्ठा, समानता व सामाजिक न्यायाच्या व्यापक प्रश्नांशी जोडेल, हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.
व्यक्ती
Joël Cabalion
सचिव
समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ जोएल काबालियों (Joël Cabalion) यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, जात, शेतीतील बदल, विस्थापन, मोठी धरणे आणि सामाजिक चळवळी या विषयांवर संशोधन केले आहे. याच दीर्घकालीन संशोधनातून India Bhimraya हा प्रकल्प साकारला आहे. एकाच गावांना आणि कुटुंबांना वारंवार भेटी देत, त्यांच्या आयुष्यात आणि समाजात काळानुसार घडणारे बदल चित्रीत करण्याच्या प्रक्रियेतून ही माहितीपट मालिका आकाराला आली आहे. या मालिकेच्या संशोधन आणि संपादकीय मार्गदर्शनाची जबाबदारी जोएल काबालियों सांभाळतात. मृणा रीबाय (Mrina Reebye) यांच्यासोबत ते या चित्रपटांचे सह‑दिग्दर्शनही करतात.
Mrina Reebye
अध्यक्षा
Mrina Reebye ‘India Bhimraya’ च्या सह‑दिग्दर्शिका असून, या प्रकल्पाच्या फील्डवर्क व चित्रपटनिर्मितीत त्यांचा निकटचा सहभाग राहिला आहे. चित्रपटांचे दिग्दर्शन, त्यांची कथात्मक व दृश्यात्मक रचना, आणि एका विस्तीर्ण संग्रहाचे—ज्यात लोकभेटी, दैनंदिन प्रसंग, प्रवास, संदर्भ, आर्काइव्ह्ज आणि घेतलेल्या पुनर्भेटींचा समावेश आहे, एका सुसंगत माहितीपट‑मालिकेत रूपांतर करण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. लोकांचे आयुष्य आणि त्यांचे जीवनप्रवास त्यांच्या संपूर्ण गुंतागुंतीसह मांडण्याच्या या प्रकल्पाच्या प्रयत्नात त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
Burhan Aliti
कोषाध्यक्ष
Burhan Aliti L’Atelier Bhimraya मध्ये कामगारवर्गीय आणि उपेक्षित शहरी वस्त्यांतील समुदायांसोबतच्या पंचवीस वर्षांच्या कामाचा अनुभव घेऊन येतात. वर्चस्वाविरुद्धच्या प्रतिकारातील सर्वात प्रभावी शक्तीं एकजुटी मध्ये आहे, या विश्वासावर त्यांचा सहभाग आधारलेला आहे.
संपर्क साधा
email hidden; JavaScript is required
email hidden; JavaScript is required