Logo India Bhimraya

इंडिया भीमरायामागील माणसे

गेल्या वीस वर्षांच्या प्रवासातून इंडिया भीमराया हा प्रकल्प अनेक व्यक्तींच्या विविधांगी सहभागातून आकाराला आला आहे. यातील काही व्यक्तींचा संबंध चित्रपटांमधून उलगडल्या जाणाऱ्या इतिहासाशी आहे; काही कुटुंबांचा जीवनप्रवास एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत विस्तारत जाताना दिसतो; तर काही माणसं चित्रपट निर्माते, कलावंत, संशोधक आणि सल्लागार म्हणून या प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. जसजसा या प्रकल्पाचा संग्रह (आर्काइव्ह) विस्तारत गेला, तसतसा या सर्वांचा सहभागही अधिक समृद्ध होत गेला.

जीवन, संघर्ष आणि विचारांचा एक समूह

या सर्व व्यक्तींच्या सहभागातूनच इंडिया भीमराया या प्रकल्पया सर्व व्यक्तींच्या एकत्रित अस्तित्वातून, प्रयत्नातूनच इंडिया भीमराया या प्रकल्पाची मानवी संरचना साकारली आहे.

यांपैकी काहींनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. तर काहींनी आपल्या शेतजमिनीसाठी, जंगलासाठी, मजुरीसाठी, घरासाठी किंवा आपल्या मातीत राहण्याच्या अधिकारासाठी संघर्ष केला. या सर्वांच्या जीवनानुभवांतून आणि संघर्षांतून या चित्रपटमालिकेचा मानवी इतिहास उलगडत जातो.

ऐतिहासिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्वे

या चित्रपटमालिकेत ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि समकालीन चळवळींतील कार्यकर्ते महत्त्वाचे संदर्भबिंदू म्हणून समोर येतात. त्यांचे विचार, त्यांनी उभारलेल्या चळवळी आणि त्यांच्याकडून पुढे आलेला राजकीय वारसा यांमुळे चित्रपटांतून अनुसरल्या जाणाऱ्या व्यक्तींचे जीवन जात, श्रम, जमीन, समता आणि भारतातील लोकशाही यांसाठीच्या प्रदीर्घ संघर्षांशी जोडले जाते.

  • Statue d Ambedkar au bord du lac

    विधिज्ञ · अर्थशास्त्रज्ञ · जातिव्यवस्थाविरोधी विचारवंत · राजकीय नेते

  • Portrait encadre sous plafond en bois

    जातिव्यवस्थाविरोधी विचारवंत · समाजसुधारक · सत्यशोधक परंपरेचे संस्थापक

  • Statue de Savitribai Phule fleurie

    शिक्षणतज्ज्ञ · जातिव्यवस्थाविरोधी समाजसुधारक · स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत

  • Portrait dun aine indien entoure de souvenirs

    समाजवादी चळवळीचे संघटक · कामगार नेते · हमाल पंचायतचे संस्थापक

नायक आणि साक्षीदार

चित्रपटमालिकेच्या केंद्रस्थानी असलेली माणसे

इंडिया भीमराया या चित्रपटमालिकेला काळाचा दीर्घ पट आणि सातत्य प्रदान करणारी ही माणसे आहेत. त्यांच्याशी आपली भेट केवळ मुलाखतींमधून होत नाही, तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या घरांमध्ये, गाण्यांतून, विधी-समारंभांतून, विवाहसोहळ्यांतून, जन्माच्या प्रसंगांतून, विस्थापनाच्या अनुभवांतून आणि पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतूनही होते. काळाच्या ओघात इतिहास सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रवेश करतो आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा संक्रमित होत राहतो, या महत्त्वाच्या प्रक्रियेचा हे चित्रपट मागोवा घेतात.

  • 20231210 150122

    लेखक · संपादक पत्रकार · निवेदक · सार्वजनिक विचारवंत

  • Portrait dun homme indien au soleil

    शेतकरी · आंभोरा गावातून विस्थापित झालेले रहिवासी · भीम गीत गायक

  • The Family 1

    तीन पिढ्या · अंभोरा

  • Portrait familial sud asiatique en interieur

    व्हॉइस-ओव्हर - निवेदनासाठी आवाज · क्षेत्रीय सहकारी · दुसऱ्या पिढीचा साक्षीदार

  • Entretien rural en Inde traditionnelle

    शेतकरी · गोसीखुर्द प्रकल्पामुळे विस्थापित झालेले रहिवासी · हिंदू धर्मातील बदलांचे साक्षीदार

  • Portrait indien au mur de briques

    विस्थापित शेतकरी · रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिक

  • 20231120 084812

    विस्थापित रहिवासी · महिला चळवळीच्या संघटक

  • Portrait documentaire de trois hommes indiens devant une tole inscrite

    शेतकरी · सार्वजनिक सेवक · गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे (GPSS) माजी संघटक

  • Femme en sari rouge au village

    विस्थापित शेतकरी · गोसीखुर्दच्या पुनर्वसित गावांतील महिला

सामाजिक चळवळींचे नेते, विचारवंत, कार्यकर्ते, गायक आणि कवी

इंडिया भीमराया या चित्रपटमालिकेत विविध संघर्षांना आकार देणारी माणसे म्हणजे - संघटन उभारणारे, आपले म्हणणे ठामपणे मांडणारे, गाणारे, लिहिणारे आणि इतरांना एकत्र आणणारे लोक. चळवळींचे संघटक, श्रमिक, सार्वजनिक विचारवंत, कवी आणि कलावंत हे व्यक्तिगत अनुभवांना सामूहिक कृतीशी जोडतात.

त्यांच्या जीवनप्रवासांतून एक महत्त्वाची प्रक्रिया उलगडते — तक्रारींचे हक्कांच्या मागण्यांमध्ये रूपांतर होणे, समुदायांचे संघटनांमध्ये रूपांतर होणे आणि प्रतिकाराला सार्वजनिक अभिव्यक्तीचा आवाज प्राप्त होणे. या प्रक्रियेमागे असलेले संयमी, सातत्यपूर्ण आणि अनेकदा अदृश्य राहणारे श्रम त्यांच्या कार्यातून समोर येतात.

  • Homme indien au jardin sac et journal

    चळवळीचे संघटक · गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती · कष्टकरी जन आंदोलन

  • Portrait dinterview dans un bureau prime

    घरकामगार महिलांच्या संघटक · मोलकरीण संघटना

  • Portrait reflechi avec badge Sa Maaa Na Taaa

    शेतकरी नेते · शेतकरी संघटना · कृषीविषयक प्रश्नांचे अभ्यासक व कार्यकर्ते

  • Portrait dune femme indienne engagee

    सामाजिक चळवळींच्या संघटक · नर्मदा बचाओ आंदोलन · जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयक (NAPM)

  • Interview feminin dans une bibliotheque chaleureuse

    घरकामगार महिलांच्या संघटक · मोलकरीण संघटना

  • Rupatai sexprime sous le chapiteau

    घरकामगार महिलांच्या संघटक · मोलकरीण संघटना

  • Portrait dun homme en chemise bleue

    चळवळींचे संघटक · जातिव्यवस्थाविरोधी, जल आणि कृषिविषयक चळवळींचे कार्यकर्ते · श्रमिक मुक्ती दल

  • Portrait dune militante devant une exposition

    संस्थापक · सर्वहारा जन आंदोलन · जमीन हक्क आणि आदिवासी हक्कांसाठी कार्यकर्त्या

  • Homme devant une peinture murale

    पुणे हमाल पंचायतीचे सचिव · हमाल

  • Vlcsnap 2026 11 06 17h45m29s525

    राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते · सामाजिक कार्यकर्ते · पश्चिम महाराष्ट्र

  • Concert de musique indienne traditionnelle

    प्रबोधनकार · लोकशाहीर · आंबेडकरवादी गायक

  • Portrait elegant au micro et veste brodee

    आंबेडकरवादी गायक · अभिनेते · चित्रपट निर्माते

  • Portrait devant les archives du cinema indien

    आंबेडकरी गायक · प्रबोधनकलावंत · कवी · संगीतकार

  • Portrait dune banquiere au bureau colore

    स्त्री-अभ्यासाच्या संशोधक · आंबेडकरी आणि डाव्या चळवळींच्या कार्यकर्त्या · पश्चिम महाराष्ट्र

  • Portrait pensif en chemise turquoise

    लोकशाहीर · गायक · नाटककार · जातिव्यवस्थाविरोधी सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते

  • Portrait dun intellectuel indien pensif

    समाजशास्त्रज्ञ · लेखक · जातिव्यवस्थाविरोधी सार्वजनिक विचारवंत

  • Portrait video dune femme sud asiatique en kurta brode

    शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्या · आशा (ASHA) – किसान स्वराज

धरणे, तज्ज्ञांचे ज्ञान आणि विकासाचे राजकारण

या चित्रपटमालिकेत ज्या पायाभूत प्रकल्पांमुळे अनेकांचे जीवन आमूलाग्र बदलले, त्या प्रकल्पांची आखणी करणारे, त्यांचे प्रशासन व व्यवस्थापन पाहणारे, त्यांचा अभ्यास करणारे आणि त्यांचे समर्थन करणारे यांचे दृष्टिकोनही ऐकले जातात.

त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कारण इंडिया भीमराया या चित्रपटमालिकेत तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य यांच्यासोबतच त्या प्रकल्पांचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या लोकांचे जगणेही एकाच ऐतिहासिक संदर्भात समोर आणले जाते.

  • Portrait realiste dun homme age priant

    स्थापत्य अभियंते · जलसंपदा मंत्रालयाचे माजी सचिव · जलधोरणविषयक प्रशासक

  • Portrait realiste dun homme barbu sur fond colore

    जोशीमठमधील कार्यकर्ते · जोशीमठ बचाओ संघर्ष समिती

  • Portrait dun homme au tilak en plein air

    ग्रामप्रमुख · लता, तपोवन परिसर

  • Ravi Chopra

    पर्यावरण अभियंते · पीपल्स सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक

जंगले, संवर्धन आणि हक्क

‘जंगलात’ या चित्रपटात जंगल एकाच वेळी पर्यावरणीय परिसंस्था, मानवी वस्तीचे अवकाश आणि शासनव्यवस्थेच्या नियंत्रणाखालील प्रदेश अशा विविध रूपांत समोर येते. जीवशास्त्रज्ञ, शेतकरी, पशुपालक, शिक्षक आणि गावांचे प्रतिनिधी यांच्या अनुभवांतून वन्यजीवांचे संरक्षण, जंगल व परिसराचा वापर, लोकांची ये-जा आणि स्थलांतर, तसेच हक्कांना मान्यता मिळण्याचे प्रश्न यांतील ताणतणाव उलगडतात.

त्यांच्या जगण्यातून एक महत्त्वाचे वास्तव स्पष्ट होते : संवर्धनाची प्रक्रिया कधीही माणसांचा वावर नसलेल्या रिकाम्या प्रदेशात घडत नाही. ती अशा सामाजिक विश्वात आकार घेत असते, ज्याला आधीपासूनच विषमता, आपलेपणाच्या भावना आणि विशिष्ट भूभागाशी जोडलेले खोल भावनिक व जीवनाधारित नाते यांनी आकार दिलेला असतो.

  • Portrait dun homme en plein echange

    सफरचंद उत्पादक शेतकरी · वनहक्क कार्यकर्ते · हिमालयीन प्रदेशातील चळवळींचे संघटक

  • Portrait pensif sous une couverture ecossaise

    भटके पशुपालक · वनवासी

  • Kailash and Prem

    सुंदरखालचे रहिवासी · वनसीमावर्ती प्रदेशातील रहिवासी

  • Portrait dune femme au sari colore

    अंगणवाडी शिक्षिका · चुकम

  • Vlcsnap 2026 11 06 21h52m55s013

    वन ग्राम प्रतिनिधी · वनसीमावर्ती प्रदेशातील रहिवासी

  • Portrait rural indien au crepuscule

    खोलदोदा येथील रहिवासी · वनसीमेजवळील शेतकरी

सामूहिक सहभाग

इंडिया भीमराया या चित्रपटमालिकेची जडणघडण केवळ ठळकपणे समोर येणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमुळे झालेली नाही, तर विविध सामाजिक वास्तवांना दृश्यमान करणाऱ्या असंख्य समूहांच्या सामूहिक उपस्थितीतूनही ती आकाराला आली आहे. गावकरी, विस्थापित कुटुंबे, कामगार, शेतकरी, पशुपालक आणि चळवळींमध्ये सहभागी झालेले लोक — हे सर्व संवाद, बैठका, गाणी, आंदोलने आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांतून एकत्रितपणे समोर येतात.

या सर्वांची उपस्थिती चित्रपटमालिकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण येथे इतिहासाची निर्मिती केवळ व्यक्तींच्या माध्यमातून होत नाही, तर सामायिक अनुभव, सामूहिक स्मृती आणि माणसांना परस्परांशी तसेच त्यांच्या जगण्याच्या भूभागाशी जोडून ठेवणाऱ्या सामाजिक संबंधांतूनही होत असते.

  • IMG 20230310 WA0015

    शेतकरी · शेतमजूर · मच्छीमार · कुटुंबे

  • Portrait rural indien devant une maison endommagee

    गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त कुटुंबे

  • Portrait de femmes indiennes en saris colores

    विस्थापित रहिवासी · सामूहिक साक्षीदार

  • Portrait dun rassemblement communautaire indien

    शहरी विस्थापित · एकजुटीचे प्रतिनिधीमंडळ

  • Rassemblement populaire contre les deplacements forces

    चळवळीतील सहभागी · गायक · साक्षीदार

  • IMG 20251109 WA0001

    वनसीमेजवळील शेतकरी · जबरन जोत करणारी कुटुंबे

  • Portrait devant une maison rurale coloree

    पश्चिम विदर्भातील शेतकरी समुदाय

  • Vlcsnap 2026 11 06 21h17m43s535

    शेतकरी · पुनर्वसित वनवासी समुदाय

  • Reunion villageoise sous les arbres

    वनवासी समुदाय · भटके पशुपालक · शेतकरी · कामगार

दिग्दर्शन, निर्मिती आणि सर्जनशील संघ

‘इंडिया भीमराया’ हा प्रकल्प संशोधन आणि चित्रपट माध्यम, क्षेत्रीय पातळीवरील दीर्घकालीन संबंध आणि तांत्रिक कौशल्य यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यातून विकसित झाला आहे. प्रकल्पाचा दस्तऐवजी संग्रह जसजसा विस्तारत गेला, तसतसे दिग्दर्शन, संकलन, ध्वनिसंकल्पना, भाषांतर, नकाशांकन आणि दृश्यनिर्मिती अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती वेगवेगळ्या टप्प्यांवर या प्रक्रियेत सहभागी होत गेल्या. प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवांतून आणि क्षेत्रीय भेटीगाठींतून आकाराला आलेल्या या सामग्रीचे पूर्णत्वास आलेल्या चित्रपटात रूपांतर करण्याची जबाबदारी या सर्वांनी सांभाळली आहे. 

  • Portrait monochrome dun homme et tigre

    दिग्दर्शक · लेखक · निर्माते · सचिव, L’Atelier Bhimraya

  • IMG 20261106 WA0059

    सहदिग्दर्शिका · अध्यक्ष, L’Atelier Bhimraya

  • IMG 20251109 WA0002

    मुख्य संकलक · छायाचित्रकार · चलचित्रणकार

  • Nitin Singh Chauhan

    छायाचित्रणकार · ड्रोन वैमानिक · निर्मिती संकल्पक · चित्रपट निर्माते

  • Julien

    ध्वनी दिग्दर्शक · संगीतकार · मानववंशशास्त्रज्ञ

  • Portrait familial sud asiatique en interieur

    व्हॉइस-ओव्हर - निवेदनासाठी आवाज · क्षेत्रीय सहकारी · दुसऱ्या पिढीचा साक्षीदार

  • Mayur Kudupale

    संशोधन सहयोगी · समाजशास्त्रज्ञ · भाषा व संवाद सल्लागार

  • Portrait dune femme souriante en sari colore

    भाषा सल्लागार · अनुवादक · संपादक

  • Nawaj

    नकाशाकार · प्रादेशिक भूगोलतज्ञ · संशोधन अधिछात्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स

  • IMG 20261023 WA0020

    दृश्यकलाकार · लेखक · चित्रकथाकार

  • IMG 20261106 WA0058

    वन्यजीव छायाचित्रकार · वन्यजीवांची जवळून केलेले चित्रीकरण · क्षेत्रकार्यामधील सहभाग

  • IMG 20231126 WA0025

    वाहनचालक · निर्मिती सहाय्यक

सल्लागार आणि प्रशासकीय व्यवस्था

इंडिया भीमरायासोबत विद्वान आणि सहयोगी आहेत, ज्यांचे कौशल्य प्रकल्पाच्या पद्धती तपासण्यास, विश्लेषण अधिक सुस्पष्ट करण्यास आणि विविध ज्ञानशाखांमध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यास मदत करते. त्यांचा सल्ला संपादकीय जबाबदारी हस्तांतरित न करता प्रकल्पाला दिशा देतो: चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांच्या चित्रपट निर्मात्यांकडेच राहते. दरम्यान, ही संघटना कायदेशीर आणि संघटनात्मक रचना प्रदान करते, ज्याद्वारे हे कार्य टिकून राहते.

  • Simon Borja

    संशोधन व कलात्मक सल्लागार · राजकीय समाजशास्त्र · क्षेत्रीय सहकारी

  • Portrait naturel devant une falaise ensoleillee

    वैज्ञानिक सल्लागार · समाजशास्त्रज्ञ

  • Portrait feminin devant une cascade verdoyante

    वैज्ञानिक सल्लागार · मानवी पर्यावरणशास्त्रज्ञ · विकासविषयक अभ्यासक

  • Sourire face aux montagnes enneigees

    वैज्ञानिक सल्लागार · ध्वनीविषयक सल्लागार · क्षेत्रीय सहकारी

संस्थात्मक कार्यव्यवस्था

L’Atelier Bhimraya ही संस्था ‘इंडिया भीमराया’  या प्रकल्पाला कायदेशीर, आर्थिक आणि संघटनात्मक अधिष्ठान प्रदान करते.

प्रकल्पाच्या संस्थात्मक कार्यव्यवस्थेची रचना जाणीवपूर्वक संपादकीय जबाबदारीपासून स्वतंत्र ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, चित्रपट निर्मिती, बौद्धिक संपदा व संबंधित हक्कांचे व्यवस्थापन, निधी संकलन, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन आणि प्रकल्पाच्या संग्रहाचे दीर्घकालीन जतन या सर्व बाबींना आवश्यक ते संस्थात्मक सहकार्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संस्था पार पाडते.

  • IMG 20261106 WA0044

    खजिनदार, L’Atelier Bhimraya

भीमराया कार्यशाळा – प्रतिमा, संग्रह आणि चळवळी

इंडिया भीमराया आणि त्याच्या संग्रहणांचे उत्पादन, जतन आणि सार्वजनिक संचलन करणारी स्वतंत्र संघटना.

इंडिया भीमराया हा L’Atelier Bhimraya – प्रतिमा, संग्रहण आणि हालचालींद्वारे चालवलेला एक स्वतंत्र माहितीपट प्रकल्प आहे.

LA Bstamp sf

या टप्प्यावर या प्रकल्पाला कोणत्याही संस्थात्मक किंवा व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य लाभलेले नाही. प्रकल्पाची निर्मिती ही त्याच्या निर्मात्यांनी स्वबळावर केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून झाली असून, त्यासाठी सार्वजनिक क्राउडफंडिंगच्या माध्यमातूनही निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात कोणत्याही संस्थेने थेट आर्थिक मदत किंवा निर्मितीविषयक सहकार्य दिल्यास, त्यांची नोंद येथे योग्य प्रकारे करण्यात येईल.

या प्रकल्पातील सदस्य ज्या विद्यापीठांशी, संशोधन केंद्रांशी, संघटनांशी किंवा इतर संस्थांशी व्यावसायिकदृष्ट्या संलग्न आहेत, तसेच ज्या संस्थांनी संशोधन, लॉजिस्टिक व्यवस्था किंवा अन्य स्वरूपाचे सहकार्य केले आहे, त्या संस्था India Bhimraya या प्रकल्पाच्या निर्मितीतील भागीदार नाहीत. संबंधित संस्थांच्या योगदानाचा उल्लेख आवश्यकतेनुसार प्रत्येक स्वतंत्र चित्रपटाच्या श्रेयनामावलीत (Credits) करण्यात येईल.

या संकेतस्थळाच्या अन्य विभागांमध्ये नमूद केलेली सदस्यांची व्यावसायिक संलग्नता ही केवळ त्यांच्या परिचयासाठी आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी दिलेली आहे. त्यावरून संबंधित संस्थांचा या प्रकल्पाला अधिकृत पाठिंबा किंवा मान्यता आहे, असा अर्थ अभिप्रेत नाही.